Veer Shiva Kashid
राजे म्हणून जन्माला नाही आलो पण शिवाजीराजे म्हणून मरण्याचे भाग्य मिळाले" वीर शिवा काशीद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! शिवा काशीदांचे धाडस, प्राणाची आहुती इतिहास कदापि विसरू शकणार नाही. कारण शिवा काशीद सारख्या मावळयांच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवराय साकार करू शकले. १२ जुलै १६६० "वीर शिवा काशिद बलिदान दिन" कोल्हापूर प्रांतातील पन्हाळगडाला सिद्दी मसूद याने दिलेल्या वेढ्यातून निसटण्यासाठी मर्द मावळा "शिवा काशिद" यांनी छत्रपती शिवरायांचा पेहराव करून पालखीतून निघाले.नेबापुरचे शिवा काशिदांना प्रतिशिवाजी बनवण्यात आले जे दिसायला राजांसारखेच होते. राजांनी आपल्या अंगावरील कापडं आणि कवड्याची माळ शिवा काशिदांना दिली. ती अंगावर चढवताच राजांनी आपल्या मस्तकावरचा जिरे टोप उतरवून शिवा काशिदांच्या मस्तकी चढवला आणि शिवा काशिदांना गहिवरून आले. पदस्पर्शाकडे वळणाऱ्या शिवा काशिदांना महाराजांनी कडकडून अलिंगन दिले. स्वराज्याच वेडं लागलेला हा राजांसारखाच एक शिलेदार होता. पण ते पकडले गेले स्वराज्यासाठी शिवा काशीद यांनी ...