कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान च्या दुसऱ्या टप्प्याचे भव्य शुभारंभ.
अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघ व भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित #कॅन्सर_मुक्त_महाराष्ट्र_अभियान च्या दुसऱ्या टप्प्याचे भव्य शुभारंभ भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखरजी बावनकुळे व अमृताताई फडणवीस यांच्या शुभहस्ते व जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी भाजपा जैन प्रकोष्ठ तर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली व कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान पूर्ण महाराष्ट्र मध्ये राबवण्यासाठी पक्षाचे संपूर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले. अमृताताई फडणवीस यांनी यावेळी कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानचे ब्रँड अँबेसिडर बनण्यास सहमती दिली व या अभियानास तन, मन व धन ने सहकार्य करण्याचे घोषित केले. संदीप भंडारी, प्रदेश अध्यक्ष भाजपा जैन प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश. #cancer #cancerawarness #AmrutaFadanvis #ChandrashakherBavankule #Lalitgandhi #SandeepBhandari #BJPMaharashtra ...