उद्योग वृद्धि यात्रा
#उद्योग_वृद्धी_यात्रा MSME मंत्रालय, भारत सरकार व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्रीय MSME मंत्री ना. नारायण राणे साहेब यांच्या मार्गदर्शनात व चेंबरचे अध्यक्ष श्री ललितजी गांधी यांच्या नेतृत्वात 17 सप्टेंबर ते 23 नोव्हेंबर च्या दरम्यान "उद्योग वृद्धी यात्रा" चे आयोजन करण्यात येत आहे. या यात्रेद्वारा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये सेमिनार आयोजित करून MSME व व्यापारी उद्योजकांसाठी असलेल्या विविध सरकारी योजना युवक, व्यापारी व उद्योजकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. उद्योग वृद्धी यात्रेची घोषणा व बोधचिन्हाचे अनावरण काल वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे माननीय केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना.उदयजी सामंत, कौशल्य विकास मंत्री ना. मंगलप्रभातजी लोढा व महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष मा. ललितजी गांधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मुख्य संयोजक (उद्योग वृद्धी यात्रा) संदीप भंडारी, युथ विंग चेअरमन, आशिष नहार, एमएसईमी कमिटी चेअरमन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर #msmeindia #...