भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश मीटिंग
#भाजपा_जैन_प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने नियोजित #कॅन्सर_मुक्त_महाराष्ट्र_अभियान संदर्भात महत्वाची बैठक 13 जानेवारी 2022 रोजी भारतीय जनता पार्टी, प्रदेश कार्यालय, मुंबई येथे जैन प्रकोष्ठ प्रदेश प्रमुख संदीप भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीस भाजपा राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी, भाजपा प्रदेश कार्यालय मंत्री मुकुंद कुलकर्णी, प्रदेश कार्यालयीन सहमंत्री भरत राऊत, आ. संजय केळकर आदींनी मार्गदर्शन केले.
26 जानेवारी रोजी कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानच्या होणाऱ्या उद्घाटनाची रूपरेषा यावेळेस ठरवण्यात आली.
बैठकीस वेगवेगळ्या जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्तावना प्रदेश महामंत्री प्रशांत मानेकर तर आभार प्रदर्शन महामंत्री विकास अच्छा यांनी केले. मुंबई विभाग प्रमुख नीरव देढिया यांनी सर्वांचे स्वागत केले.
भाजपा जैन प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश
#cancermuktmaharashtra
#bjpjain
Comments
Post a Comment