पत्रकार दिन, बाळशास्त्री जांभेकर जयंती

मराठीतले आद्य पत्रकार, समाजसुधारक बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन !
बाळशास्त्री जांभेकर हे नाव उच्चरल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर पहिली प्रतिमा येते ती मराठीतले पहिले वृत्तपत्र दर्पण सुरु करणारे अशी. पण अनेक विषयांचे ज्ञान आत्मसात केलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांची ‘बॉंबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’मध्ये विद्यालयात शिक्षक म्हणून तसेच एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले भारतीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली. 

बाळशास्त्रींना मराठीसह दहा भाषांचे ज्ञान होते. फ्रेंच भाषेवरील प्रभुत्त्वाबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा सन्मान झाला होता. जांभेकरांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून शिलालेख व ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली. गणित व ज्योतिष यावर त्यांचे प्रभुत्व होते म्हणून त्यांची कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती.

मुंबईतल्या वास्तव्यात पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्ऱ्य, भाकड समजुती यामुळे समाज कसा मागासलेला राहिला आहे, हे त्यांना दिसले. केवळ अध्यापन उपयोगाचे नाही; तर संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत. त्यासाठी वृत्तपत्र काढावे, असे त्यांना वाटू लागले. या जाणिवेतून त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.
अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वास शतशः नमन! 

Comments

Popular posts from this blog

Who was BHAMASHAH

Sandiip Bhandari,s interview on LBT issue