भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीने "कैन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान

भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीने "कैन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान"
------------------------------------------------------------------
२६ जानेवारी ते १५ ऑगस्ट दरम्यान  अंतर्गत १०००० मोफत कैंसर तपासणीचे लक्ष्य.- संदीप भंडारी प्रदेशाध्यक्ष, भाजपा जैन प्रकोष्ठ
-------------------------------------------------------
कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे, आपल्या दिनचर्येमुळे आणि आहारामुळे कॅन्सर सारख्या आजाराने उग्र रूप धारण केले आहे आणि हा आजार भारतातच नाही तर जगभर झपाट्याने पसरत आहे, त्यामुळे अनेक घरे उध्वस्त होताना दिसत आहेत. हा रोग टाळण्याचा आणि त्याच्या मुळापासून समूळ नष्ट करण्याचा एकमेव पर्याय म्हणजे "जागरूकता आणि पूर्व तपासणी".

कर्करोगाचं निदान व कर्करोगास कारणीभूत जीवनशैली टाळण्यासाठी जागरूकता निर्माण करणे ह्या उद्देशाने विरोधी पक्ष नेते मा.आ. देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात, अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललितजी गांधी यांच्या सहकार्याने व भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांच्या संकल्पनेतून भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीने भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या "आजादी का अमृत महोत्सव" कार्यक्रम अंतर्गत २६ जानेवारी २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान "कैन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान" हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. 

अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघच्या अत्याधुनिक "मोबाइल कॅन्सर डिटेक्शन बस" च्या माध्यमातून महाराष्ट्र मध्ये १३१ कॅन्सर तपासणी शिबिरांचे आयोजन करून १०००० हून अधिक नागरिकांच्या मोफत कॅन्सर तपासणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. ज्या मधे स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग आदि तपासणया होणार असल्याची माहिती संदीप भंडारी यांनी दिली

त्याचप्रमाणे "कॅन्सर जागरूकता अभियान" अंतर्गत राज्यभरात "कॅन्सर जागरूकता रॅली", शाळा-कॉलेज मध्ये "कॅन्सर विषयक व्याख्यान" आयोजित करुण १ लक्ष नागरिकांपर्यंत पोहोचन्याचे उद्दीष्ठ आहे.

सदर महा अभियानाचा शुभारंभ विश्व कॅन्सर जागृकता दिवस चे अवचित्ते साधून ०४ फेब्रुवरी २०२२ रोजी भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथून विरोधी पक्ष नेते आ.देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारतीताई पवार, महासंघचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी दिली

Comments

Popular posts from this blog

Who was BHAMASHAH

Sandiip Bhandari,s interview on LBT issue