प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा
भारत स्वतंत्र झाल्यानंतर खऱ्या अर्थाने लोकशाही पर्व सुरु झाले व आपला देश सार्वभौम प्रजासत्ताक बनला तो आजच्या दिवाशी! भारताच्या प्रत्येक घटकाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या प्रतिनिधींच्या अथक प्रयत्नांतून बनलेली राज्यघटना पूर्णपणे २६ जानेवारी १९५० रोजी संपूर्ण देशभरात लागू झाली. प्रजासत्ताक म्हणजे नागरिकांचे राज्य. जुलुमी ब्रिटिश साम्रज्याची असलेली आपल्यावरची सत्ता, त्यांचे कायदे विसर्जित करून आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या तत्वांवर आधारित संविधान अंगिकारले. आपले संविधान हीच आपली खरी ताकद व आपली ओळख आहे. त्यातील तत्वांचा आदर करून ते प्रत्यक्षात आणणे हे आपले भारतीय नागरिक म्हणून कर्तव्य आहे. आपला भारत देश जगातील सर्वात मोठे लोकशाही गणराज्य म्हणून टिकावे यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा #प्रजासत्ताक_दिन #RepublicDay #SandeepBhandari